उद्या बारामती नगर परिषदेची ऑनलाइन हरित शपथ
माझी वसुंधरा अभियानांतर्गत लाईव्ह कार्यक्रम
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या वतीने ऑनलाइन हरित शपथ (Earth pledge #Epledge) चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या द्वारा संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियानाची दिनांक 2 ऑक्टोबर 2020 पासून सुरुवात झाली असून त्यामध्ये पृथ्वी,वायू, जल,अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शहराचे मुल्यांकन होणार आहे.
बारामती नगर परिषद या अभियानात उच्चतम मानांकन मिळविण्याकरिता प्रयत्नशील आहे.
शहरातील नागरिकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याकरिता वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी व बांधिलकी म्हणून शहरातील नागरिकांनी दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामती नगरपरिषदेच्या फेसबुक पेजवर आणि केबल टीव्ही चॅनेल नंबर 131वर लाईव्ह दिसणार आहे त्यामुळे नागरिकांनी घरात बसूनच टीव्हीसमोर ऑनलाईन स्वरुपात शपथ घ्यावी असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम NXT (इन केबल) वर चैनल नंबर 131 वर लाईव्ह असणार आहे त्याचाही लाभ शहरातील सर्व नागरिकांनी घ्यावा.