उद्या होणाऱ्या भारत बंदला इंदापूर तालुका काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा
पत्रकाद्वारे दिली माहिती
उद्या होणाऱ्या भारत बंदला इंदापूर तालुका काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा
पत्रकाद्वारे दिली माहिती
इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून केंद्राने केलेला कायदा पूर्णपणे शेतकरी विरोधी असून तो व्यापारी धार्जिणा आहे.यामुळे सबंध भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी या कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला असून अनेक भागात रास्तारोको, चक्काजाम सारखी आंदोलन होत आहेत. या शेतकरी आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून यानिमित्ताने उद्या होणाऱ्या भारत बंद ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असून या अनुषंगाने इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्याच्या भारत बंदला जाहीर पाठिंबा देण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी देखील प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भारत बंदला जाहीर पाठिंबा देण्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे.