उद्योगपतीस झालेल्या मारहाणीबाबत पंतप्रधानांना निवेदन देणार :- अरुण जिंदाल.
असा प्रकार घडत राहिल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होणार नाही

उद्योगपतीस झालेल्या मारहाणीबाबत पंतप्रधानांना निवेदन देणार :- अरुण जिंदाल.
असा प्रकार घडत राहिल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होणार नाही
निलेश भोंग
प्रतिनिधी:-
दिनांक 24 रोजी इंदापूर तालुक्यातील लोणी एमआयडीसी येथील उद्योजक अशोक जिंदाल यांना झालेल्या मारहाणी बाबत त्यांचे बंधू अरुण जिंदाल म्हणाले की उद्योजक अशोक जिंदाल यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आम्ही रीतसर तक्रार इंदापूर पोलिस ठाण्यात दिली असुन आमचा संबंधित पोलिस प्रशासन व न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
जर उद्योगपतींना मारहाण होत राहिल्यास इंदापूर तालुक्यातील अनेक कंपन्या पलायन करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे इंदापूर तालुक्याचे सामाजिक व आर्थिक नुकसान होणार आहे.असा प्रकार घडत राहिल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होणार नाही असेही अरूण जिंदाल म्हणाले.
पुढे जिंदाल म्हणाले की आम्ही लोणी देवकर येथील कंपनीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून कंपनी विस्तृत स्वरूपात वाढवून अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती. परंतु आम्ही या प्रकारामुळे कंपनीचे विस्तार काम थांबवले आहे.
लोणी देवकर या ठिकाणी झालेल्या मारहाणीमुळे माझे बंधू श्री. अशोक जिंदाल यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्या डोळ्याला मोठ्याप्रमाणात इजा झाली आहे असेही अरूण जिंदाल म्हणाले .
सदर घडलेल्या घटनेचे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब, यांच्याकडे कठोर कारवाईच्या मागणीसाठी देणार आहे असे अरुण जिंदाल म्हणाले .
चौकट:-
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे महाराज यांच्याबद्दल मला व माझ्या कुटुंबियांना नितांत आदर आहे.