उद्योगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न – धनंजय जामदार
एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
उद्योगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न – धनंजय जामदार
एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
बारामती वार्तापत्र
राज्य व केंद्र सरकारचे उद्योगांसाठीच्या अनेक योजना ग्रामीण भागातील उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन विविध उपक्रम राबवत असून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत असे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ, इंडिया एसएमई फोरम आणि बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन यांनी संयुक्तपणे हॉटेल सिटी इन येथे आयोजित केलेल्या महाउद्यमी सशक्तीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक भाषणात ते बोलत होते.
सीएमईजीपी, पीएमइजीपी, सीजीटीएमएसइ योजने अंतर्गत वित्तीय सहाय्य, निर्यात प्रोत्साहन योजना, जी ई एम पोर्टलच्या माध्यमातून सरकारी विभागांची कामे लघुउद्योगांना मिळवून देणे, ट्रेडमार्क व पेटेंट नोंदणीसाठी अनुदान अशा विविध योजनांची विस्तृत माहिती या एक दिवसीय कार्यशाळेत उद्योजकांना देण्यात आली. कार्यशाळेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
बारामती परिसरातील नोंदणीकृत लघुउद्योगांसाठी सदर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करून यशस्वी करण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख वकील, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे आदी पदाधिकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यशाळेमध्ये शिखा चौहान, अॅंड सिध्दार्थ दुबे, रितेश सिंग या तज्ज्ञांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सदस्य संभाजी माने यांनी समारोप प्रसंगी आभार मानले.