कोरोना रुग्णांसोबत आमदार रोहित पवार झिंगाट गाण्यावर थिरकले…!

रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोरोना रुग्णांसोबत आमदार रोहित पवार झिंगाट गाण्यावर थिरकले…!

रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अहमदनगर :बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशावेळी कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयांसह कोविड सेंटर्सही महत्वाची भूमिका बजावत आहेत. कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना उपचारासह मानसिक आधार देण्याचे प्रयत्न विविध सेवाभावी संस्था आणि नेतेमंडळींकडून सुरु आहेत. त्याचाच प्रत्यय आज अहमदनगरच्या गायकरवाडीत आला. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हीड केअर सेंटरला आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कोरोना रुग्णही भारावल्याचं पाहायला मिळालं.

Related Articles

Back to top button