राजकीय
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांची भावनिक पोस्ट; म्हणाले…
माझ्यासाठी याहून मोठा आनंद कोणताच नाही.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांची भावनिक पोस्ट; म्हणाले…
माझ्यासाठी याहून मोठा आनंद कोणताच नाही.
बारामती वार्तापत्र
- शपथविधीनंतर अजित पवारांची भावनिक पोस्ट
- उपमुख्यमंत्री झाल्यावर आईकडून अजितदादांचं स्वागत
- पत्नी सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांचं औक्षण
महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला.
महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शपथविधीनंतर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अजित पवार म्हणाले की, मी खरंच भाग्यवान..! आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाची मला भक्कम साथ..!
आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आईनं, बहिणीनं आणि पत्नीनं औक्षण करून माझं स्वागत केलं. मुलांनी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिल्या. माझ्यासाठी याहून मोठा आनंद कोणताच नाही. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.