स्थानिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिवांचा बाप काढला मात्र संचालकांच्या भावाची त्यामध्ये पंपाची लाखोंची उधारी

आता ह्या संचालकच्या भावाची उधारी असताना याच संचालकाला जेलमध्ये टाकणार का?व काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिवांचा बाप काढला मात्र संचालकांच्या भावाची त्यामध्ये पंपाची लाखोंची उधारी

आता ह्या संचालकच्या भावाची उधारी असताना याच संचालकाला जेलमध्ये टाकणार का?व काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष

बारामती वार्तापत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मार्केट कमिटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बाजार समितीचे सचिव यांना जेलमध्ये टाकील व मार्केट कमिटी तुझ्या बापाची आहे का असा सवाल केला होता.

परंतु मार्केट कमिटी मधील संचालकाच्या शिफारशीवरून त्याच्या भावाला लाखो रुपयांचे डिझेल उधार दिले असल्याचे उघड झाले आहे. एकूण 18 पैकी 12 संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सभापती व सचिव यांच्या विरोधात तक्रार केली होती.

परंतु या उधारीमध्ये ज्या 12 संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली त्यातीलच एका संचालकाच्या भावाची लाखो रुपयांची पंपाची उधारी आहे. ते संचालक स्वतःच्या भावाची उधारी असतानाही तक्रार करताना दिसत आहेत.आता उपमुख्यमंत्री अजित पवार या संचालकाचाही बाप काढणार का?

मार्केट कमिटीचे पंपावरून वर्षानुवर्ष पंपावरून पेट्रोल व डिझेल जे विश्वासू खातेदार आहेत त्यांना ठराव करून उधार देण्यात येते.परंतु या संचालकाने त्यामध्ये स्वतःच्या भावाची शिफारस केली आणि त्यानेही पंपाची लाखो रुपयांची उधारी थकवली आहे.ज्या 12 संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली त्यांना या सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा ते दूतोंडी भूमिका घेत असून हे संस्थेच्या हितास त्रासदायक ठरणार आहे.

एकूणच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हाती सत्ता असतानाही संचालकामध्ये फूट पडल्याचे दिसत आहे.

Back to top button