उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर बस स्टॅन्ड वरील जाहिरातींवर तुटपुंजी कारवाई
अस्वच्छता असून ठीक ठिकाणी कचरा पडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर बस स्टॅन्ड वरील जाहिरातींवर तुटपुंजी कारवाई
अस्वच्छता असून ठीक ठिकाणी कचरा पडला आहे.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिक पत्रकारांने बसस्टँड वर जाहिरातीसाठी खिळे ठोकण्यात आले होते.जाहिरातीचे फोटो पवार यांना दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
पोलीस निरीक्षक अशोक बाबासाहेब राऊत यांना कारवाई करण्यासाठी सांगितले होते. पोलिसांनी याबाबत डेपो मॅनेजर यांना याबाबत कारवाई करण्यास पत्राद्वारे सांगितले होते.
परंतु कारवाई केल्याचे दिसत नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शैलीमध्ये डेपो मॅनेजरला सूचना देणार का हे पहावं लागणार आहे.
बारामतीचे बस स्टॅन्ड बघण्यासाठी संपूर्ण राज्यातून नागरिक येत असतात परंतु त्या बस स्टॅन्डचे विद्रूपीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून ठीक ठिकाणी कचरा पडला आहे.
परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला डेपो मॅनेजरने केराची टोपली दाखवली आहे.बस स्टँड वरील जाहिराती जर सर्वसामान्य नागरिकांच्या असत्या तर लगेच कारवाई झाली असती.मात्र बड्या व्यक्तींवर कारवाई होत नाही हे मात्र स्पष्ट झाले आहे.