स्थानिक

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हे आमचे नगराध्यक्ष सचिन सातव

उद्घाटन सोहळ्यादरम्यान एक लक्षवेधी प्रसंग घडला

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हे आमचे नगराध्यक्ष सचिन सातव

उद्घाटन सोहळ्यादरम्यान एक लक्षवेधी प्रसंग घडला

बारामती वार्तापत्र 

बारामती येथे देशातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा बारामतीला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या एआय सेंटरचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार तसेच युवा नेते युगेंद्र पवार उपस्थित होते.उद्घाटन सोहळ्यादरम्यान एक लक्षवेधी प्रसंग घडला

. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांची गौतम अदानी यांच्याशी ओळख करून देताना “हे नवीन नगराध्यक्ष सचिन सातव”अशी ओळख करून दिली.यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

दरम्यान, या एआय सेंटरमुळे बारामतीच्या शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्योन्मुख आणि दर्जेदार शिक्षण मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

गौतम अदानी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे बारामतीच्या शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Back to top button