
गिरमे,भोसले शिव मॅरेथॉन मध्ये विजयी
शिवजयंती निमित्त आशा कार्यक्रम ची आवश्यकता
बारामती वार्तापत्र
शिवजयंती निमित्त दुर्गभ्रमती सोशल फौंडेशन च्या वतीने शिव मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात सत्यमेव करिअर अकॅडमी चा संजय भोसले व मुलींच्या गटात धनशी गिरमे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
शनिवार दि 19 फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता मान्यवरांच्या उपस्तीत स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला पंचायत समिती चौक ते पेन्सील चौक व परत पंचायत समिती असे मुलांसाठी सात किलोमीटर तर मुलींसाठी पाच किलोमीटर अंतर स्पर्धेसाठी होते. मुलांच्या गटात सत्यमेव करिअर अकॅडमी चे संजय भोसले व द्वितीय क्रमांक देवगिरी करिअर अकॅडमी चा रोहित भगत तर तिसरा क्रमांक अप्पा दादा शिंदे यांनी मिळवला तर मुलींच्या गटात प्रथम धनशी गिरमे,द्वितीय अपेक्षा कदम व तृतीय योगिता वरे यांनी पटकावला या वेळी चारशे स्पर्धकांनी सहभाग घेतला.
तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष संभाजी होळकर,बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,नगरसेवक अतुल बालगुडे, प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील,तालुका क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे व पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे, योगेश वाघ, अविनाश लगड,शरद नामदेव, प्रा सुजित वाबळे,सचिन सावंत,महेश पानसरे,मंगेश ओमासे,सरफराज शेख आदी मान्यवर उपस्तीत होते.
दुर्गभ्रमंती सोशल फौंडेशन गड किल्ले संवर्धन करत असताना जनजागृती साठी सहल चे आयोजन करत असते व गड किल्ल्यावर धूम्रपान करू नये या साठी प्रबोधन करून दिवाळी मध्ये किल्ले सजावट स्पर्धा चे आयोजन व क्रीडा संस्कृती वाढण्यासाठी गड किल्ले चढणे स्पर्धाचे आयोजन करत असल्याचे दुर्गभ्रमती सोशल फौंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.
शिवजयंती निमित्त आशा कार्यक्रम ची आवश्यकता असून विद्यार्थी पासुन ते ज्येष्ठां पर्यंत विविध क्षेत्रातील पुरुष व महिलांनी या मध्ये सहभाग घेऊन फिटनेस बाबत दक्ष असल्याचे दाखवून दिले असे मान्यवरांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार चंदू लोंढे यांनी मानले बारामती नगरपरिषद च्या वतीने वसुधरा अभियान अंतर्गत उपक्रमाची सामूहिक शपथ खेळाडू याना देण्यात आली.