उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 2 रूग्णवाहिकेंचे लोकार्पण….
कन्हेरी येथे उद्यानाचे भूमिपूजन...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 2 रूग्णवाहिकेंचे लोकार्पण….
कन्हेरी येथे उद्यानाचे भूमिपूजन…
बारामती वार्तापत्र
स्टेट बँक ऑफ इंडिया फौंडेशनच्यावतीने बारामती येथील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ‘एसबीआय’चे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग, महाव्यवस्थापक श्रीमती सुखविंदर कौर उपस्थित होते. तसेच मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्या मार्फत 15 सॅनिटायझर व सुपे येथील 85 निराधार, विधवा व दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 1001 रुपयांचा धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मयुरेश्वर प्रतिष्ठानचे सुशांत जगताप व तुषार हिरवे उपस्थित होते.
याचबरोबर मॅग्नम एन्टरप्रायझेस यांच्याकडून कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी लागणारी काही औषधे व कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री मदत म्हणून देण्यात आली. बारामती येथील हॉटेल डोसा प्लाझाचे योगेश भगवान पानसरे व दिनेश मोहन पानसरे यांच्याकडून देखील कोविड 19 साठी मदत म्हणून 25 हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कन्हेरी येथे उद्यानाचे भूमिपूजन…
बारामती येथील कन्हेरी गावामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोविड 19 नियमांचे पालन करून वन विभागाकडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक पुणे राहूल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती राहूल काळे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.