मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रदान

मंत्रालयात उपमुख्यमंत्री दालनात सदर पुरस्काराने ने सम्मानित करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रदान

मंत्रालयात उपमुख्यमंत्री दालनात सदर पुरस्काराने ने सम्मानित करण्यात आले.

बारामती वार्तापत्र

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात करोनामुक्ती साठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन कडून ” सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वीझरलंड ) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् चे यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्ती साठी जनजागृति केली जात आहें. तसेच करोना मुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सदर संस्था मार्फत व्यक्ती व संस्था ना सम्मानित करण्यात येत आहें.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय , वैदकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य आदी कार्याची कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार दिला गेला आहे.

या उपक्रमा अंतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन चे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री मा श्री अजित पवार यांना मंत्रालयात उपमुख्यमंत्री दालनात सदर पुरस्काराने ने सम्मानित करण्यात आले.

Back to top button