उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन उत्साहाचं वातावरण कायम राहो, यासाठी प्रार्थना

गर्दी टाळण्यासाठी त्यांनी पहाटेच्या वेळेस मंदिरात हजेरी लावली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन उत्साहाचं वातावरण कायम राहो, यासाठी प्रार्थना

गर्दी टाळण्यासाठी त्यांनी पहाटेच्या वेळेस मंदिरात हजेरी लावली होती.

प्रतिनिधी

तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीचे साई बाबा मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तुजळापुरातील भवानी मातेचं मंदिर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन उत्साहाचं वातावरण कायम राहो, यासाठी प्रार्थना केली.

Related Articles

Back to top button