मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी

राज्यात सीएनजी इंधन स्वस्त झाल्याने वातावरण प्रदुषण नियंत्रणासही मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी

‘सीएनजी’वरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3 टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 1 एप्रिलपासून नवे दर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘सीएनजी व्हॅट’ कपात निर्णयाचा टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना फायदा

राज्यात सीएनजी इंधन स्वस्त झाल्याने वातावरण प्रदुषण नियंत्रणासही मदत

मुंबई, प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

Related Articles

Back to top button