इंदापूर

इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे दत्त देवस्थान व मानाचे विना पूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा

इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे दत्त देवस्थान व मानाचे विना पूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा

बारामती वार्तापत्र
निरा भिमा सहकारी साखर कारखाना उभारणी नंतर,शहाजीनगर व रेडा परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.त्याचप्रमाणे दत्त देवस्थानामुळे शहाजीनगर परिसराच्या वैभवात वाढ झाल्याने,अनोखे चैतन्य निर्माण झाले आहे.असे गौरवोद्गार राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त शहाजीनगर(रेडा)येथील दत्त देवस्थान येथे,गुरुचरित्र पारायनाची सुरवात ग्रंथपुजा तसेच विनापुजन राज्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बुधवार(ता.23 रोजी)हरीनामाच्या गजरात करण्यात आली.यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.

उपस्थितांचे स्वागत देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,यांनी केले.

तर पहाटेची श्रीची महापुजा व अभिषेक इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या शुभ हस्ते व प्रवीण देवकर पाटील,मोनिका प्रवीण देवकर -पाटील या उभयतांच्या हस्ते पार पडली.तसेच साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम डी गेंगे यांच्या हस्ते धूप पूजा पार पडली.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव देवकर,तसेच निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ऍडव्होकेट तानाजीराव देवकर,ज्येष्ठ नेते किसनराव देवकर,चेअरमन राजेंद्र देवकर,हरीदास देवकर,पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले,उदयसिंह जाधव देशमुख,व युवक नेते पोपट देवकर,विनोद भोसले,दत्तात्रय सोनटक्के,ह.भ.प.तुकाराम महाराज काळकुटे,शंकर जाधव यांच्यासह वारकरी भजनी मंडळ उपस्थित होते.

गेल्या 17 ते 18 वर्षांपासून अखंड हरिनाम दत्त देवस्थान मुळे होत असते.परंतु यंदा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दत्त देवस्थान,दत्त जन्मोत्सव विस्तृत न साजरा करता,साध्या पद्धतीने विधिवत पूजन, प्रबोधन या माध्यमातून साजरा करण्याचा निश्चय केला आहे ही गोष्ट आनंददायी आहे.दत्त देवस्थानासाठी लागणारी मदत आमच्या माध्यमातून अखंड दिली जाईल अशीही ग्वाही माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक नीलकंठ मोहिते यांनी केले तर आभार दगडू गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Back to top button