क्राईम रिपोर्ट

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत. नगरपरिषदेच्या नगररचनाकाराला लाच प्रकरणी अटक

दोन महिन्यांपूर्वीच पुण्याहून बारामती नगरपरिषदेत बदलून आले आहे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत. नगरपरिषदेच्या नगररचनाकाराला लाच प्रकरणी अटक

दोन महिन्यांपूर्वीच पुण्याहून बारामती नगरपरिषदेत बदलून आले आहे

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार विकास किशोर ढेकळे यांना लाच मागणी प्रकरणात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास शहरातील एका जिममधून ढेकळे यांना एसीबीने ताब्यात घेत अटक केली.

जीममध्ये एसीबीने केलेल्या या कारवाईची मोठी चर्चा शहरात झाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बारामती नगरपरिषदेचा नगररचना विभाग सातत्याने विविध कारणांनी चर्चेत असतो. ढेकळे हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पुण्याहून बारामती नगरपरिषदेत बदलून आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच दहा दिवसांची दुबई टूर केल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!