उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन
410 कोटी तीस लाख रुपये ) इतका निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन
410 कोटी तीस लाख रुपये ) इतका निधी
बारामती वार्तापत्र
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणाचीही मागणी नसताना लाडकी बहीण योजना काढली या योजनेमार्फत महिलांना दरमहा 1500 देण्यात येतात अशा प्रकारच्या योजना काढल्याने साहजिकच सरकारवर आर्थिक बोजा येणार मुळातच या योजनेसंदर्भात कोणतेही प्रकारचे नियोजन केलेले नसल्याने व या योजनेसाठी एवढा मोठा निधीची तरतूद कुठून करणार याबाबतचे नियोजन शून्य असल्याने ही योजना चालवण्यासाठी सरकारला वर लोड येत आहे.
ही योजना चालू करताना सरकार मधील नेत्यांकडून सांगण्यात येत होते कि ही योजने चालवण्यासाठी आमच्या कडे खूप निधी आहे व तशी आम्ही तरतूद केली आहे परंतु ही योजना चालवण्यासाठी सरकार कडे निधी नसल्याचे समोर आले आहे याचे कारण इतर लोकांच्या हक्काचे निधी सरकारला वळवावे लागत आहेत.
दिनांक 2 मे 2025 रोजी शासन निर्णय क्र. मवबा-2025/प्र.क्र. 83/कार्या- या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी समाज कल्याण मार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा 410.30 कोटी (अक्षरी 410 कोटी तीस लाख रुपये ) इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बाल विकास विभागास वळवला आहे. यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीने सरकारचा जाहीर निषेध केला आहे. कारण अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांच्या हक्काचा निधी, त्यांचे जीवनमान सुधारणार निधी, त्यांची दर्जा वाढवणारा निधी, शिक्षणासाठी खर्च करावयाचा निधी, अत्याचार ग्रस्त लोकांचे पुनर्वसन करणारा निधी, घरकुलासाठी वापरणारा निधी, व्यवसाय सुरू करण्यासाठीचा निधी, भूमिहीन शेतकऱ्यांसाठीचा निधी व इतर सामाजिक न्याय देण्यासाठी वापरावयाचे निधी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वळवून बेकायदेशीर कृत्य केले आहे.
अशाप्रकारे निधी वळवू शकत नसतानाही सामाजिक न्यायाचा निधी वळून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांवर अन्याय केला असल्याच्या निषेधार्थ तसेच हा निधी परत करावा,
अशाप्रकारे अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचा हक्काचा निधी वळवून नये यासाठी बजेटचा कायदा करावा
लाडक्या बहीण योजनेसाठी स्वातंत्र्य तरतूद करणे, सामाजिक न्यायाचा निधी बेकायदेशीरपणे वापरणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात व त्यांच्यावर कठोर कारवाई करणे या मागण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने दिनांक 08/05/2025 रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहयोग सोसायटी, बारामती येथील घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, मंगलदास निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, उपाध्यक्ष गणेश थोरात, महासचिव प्रतीक चव्हाण, सहसचिव कृष्णा साळुंके, बारामती तालुकाध्यक्ष अनुप मोरे, इंदापूर तालुका अध्यक्ष, कीर्तीकुमार वाघमारे, दौंड तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, जितेंद्र कवडे, किशोर मोरे, सागर गवळी, मंगेश सोनवणे, जितेंद्र जगताप, प्रीतम कांबळे, अण्णा घोडके, आर्यन साळवे, आसिफ शेख, शिवाजी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.