स्थानिक

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची करणार पाहणी

सकाळी ९ वाजता सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबार आयोजित

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची करणार पाहणी

सकाळी ९ वाजता सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबार आयोजित

बारामती वार्तापत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवार दि. १९ जुलै रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटेपासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार असून दिवसभरात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दि. १९ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील.

दुपारी २ वाजता बारामती शहरातील मारवाड पेठ येथील लाईट झोन या शोरूमला अजितदादा भेट देतील. तसेच २.३० वाजता भिगवण रस्त्यावरील शर्वरीज हेल्दी बाईट या हॉटेलचं उदघाटन होणार आहे.

त्यानंतर ३ वाजता गोजुबावी येथील ओमराज पेट्रोलियम या पेट्रोलपंपाचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी ४ वाजता ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी खाना होतील.

Back to top button