उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भाटनिमगाव येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा - श्रीराज भरणे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भाटनिमगाव येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा – श्रीराज भरणे
इंदापूर;प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमी म्हणतात गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भाटनिमगाव येथे आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम हे गोरगरीब नागरिकांच्या संबंधित असल्याने मनाला समाधान वाटल्याची भावना युवा नेते श्रीराज भरणे यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे वृक्षारोपण, गोरगरीब विधवा महिलांना साडी वाटप, पंचमीनिमित्त लहान मुलांना पतंग व मुलींना सौंदर्य प्रसादानांचे वाटप श्रीराज भरणे व तेजस्विनी भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी श्रीराज भरणे बोलत होते. यावेळी बोलताना भरणे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे, परंतु भाटनिमगाव येथील माजी सरपंच मनोहर भोसले व कार्यकर्त्यांनी राबविलेला हा उपक्रम मनाला आनंद देणारा आहे, भविष्यात मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून भाटनिमगाव येथील विकास कामांना निधी कमी पडणार नाही.
यावेळी बोलताना कार्याध्यक्ष अतुल झगडे म्हणाले भाटनिमगाव येथील माजी सरपंच मनोहर भोसले व पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकसंग राहून भविष्यात पक्ष वाढीचे काम करावे. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गावातील विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मनोहर भोसले यांची गावातील विकास कामासंदर्भात तळमळ असते, मंत्री भरणे यांच्या माध्यमातून गावाला काय मिळेल याकडे त्यांचा कल असतो असे नेतृत्व जपले पाहिजे.
यावेळी बोलताना माजी सरपंच मनोहर भोसले म्हणाले क्रीडा अल्पसंख्यांक व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे आरोग्य दूत आहेत, त्यांच्या आरोग्य निधीतून गावातही फायदा झाला आहे, मंत्री भरणे यांच्या माध्यमातून यापूर्वी गावात कोट्यावधी रुपयांचा निधी आला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सिमेंट रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याने त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले.
वृक्ष लागवड करण्यासाठी श्री नारायणदास रामदास ट्रस्टच्या माध्यमातून वृक्ष उपलब्ध करण्यात आले यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने शहा परिवाराचे आभार मानण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, तेजस्विनी भरणे, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन पंजाबराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष निलोफर पठाण, विष्णू पाटील, सचिन खामगळ, दिलीप पाटील, माऊली नाचन, सुखदेव गुरगुडे, दादा भांगे, धनंजय खराडे, लहू भोसले, नामदेव गायकवाड सिद्धेश्वर जाधव, भारत यादव, आकाश गायकवाड, समाधान भोसले, मुकेश साळुंखे, दिलीप पवार, सतीश खबाले, समाधान खबाले, किरण शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश साळुंखे यांनी केले, सूत्रसंचालन संतोष नरोटे तर आभार आकाश गायकवाड यांनी व्यक्त केले.