
दौंडमध्ये कोरोनाचा हाहाकार.
एकाच दिवशी कोरोनाचे 18 नवे रुग्ण.
दौंड:-प्रतिनिधी
दौंड शहरात आज कोरोना चा उद्रेक झाला. शहरातील विविध भागात आज १४ ते ७३ वयोगटातील तब्बल १३ नवे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यातही पाच रुग्ण आढळून आले आहेत.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. काल शहरात आढळलेल्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील ७८ जणांच्या घशाच्या स्त्रावातील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आज प्राप्त झाला. यामध्ये शहरातील विविध भागातील १३ जणांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला. ६ पुरुष व ७ महिलांचा समावेश असून १५ ते ७३ वयोगटातील हे रूग्ण आहेत. कालच शहरातील अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.अनेक उपाययोजना करूनही शहरातील कोरोना बाधीतांची संख्या कमी होताना दिसत नाही. आज शहरातील शालिमार चौक, गांधी चौक, सुतार नेट, स्टेट बँक परिसर, गजानन सोसायटी, सरपंच वस्ती, गोपाळवाडी, नेहरू चौक आदी भागातून हे रूग्ण आढळले आहेत.
दरम्यान ग्रामीण व दौंड शहरात आतापर्यंत २०३५ जणांचे नमुने तपासणी पाठविण्यात आले होते. आज दौंडच्या ग्रामीण भागात कुरकुंभ येथे दोन, भांडगाव येथे एक व पाटस येथे दोन रूग्ण असे पाच रूग्ण सापडले आहेत. यातील पाटस येथील एका ६० वर्षाच्या जेष्ठाचा मृत्यू झाला आहे. दौंड मध्ये एकुण पाँझिटिव्ह रुग्ण २१५ असून सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या ५९ आहे.उपचार घेऊन घरी गेलेले १४७ असून आता पर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे