उपमुख्यमंत्र्यांच्या गावातच लसीचा तुटवडा !
चार-पाच दिवसांपासून लस संपल्याचे सांगून परत पाठवले जात

उपमुख्यमंत्र्यांच्या गावातच लसीचा तुटवडा !
चार-पाच दिवसांपासून लस संपल्याचे सांगून परत पाठवले जात
बारामती वार्तापत्र
बारामतीच्या शासकीय महिला रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध नसल्याचा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अनेकजण शहरातील शासकीय रुग्णालयात जात आहेत. परंतु, मागील चार-पाच दिवसांपासून लस संपल्याचे सांगून परत पाठवले जात आहे. खासगी रुग्णालयांकडूनही नकार घंटा देण्यात आली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात माेठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्याने शहरातील अनेकांनी काटेवाडीकडे धाव घेतली. मात्र, काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्शनी भागातच लस उपलब्ध नसल्याचे फलक लावलेले बघून नागरिकांना परत फिरावे लागले. काहींनी प्रशासनाकडे चाैकशी केली असता लस उपलब्ध झाली की कळवले जाईल, असे सांगण्यात आले.