स्थानिक

उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात सकाळी तक्रार तर रात्री न्याय

बारामती पोलिसां च्या मदतीने ज्येष्ठाना मिळवून दिली हक्काची जमीन

उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात सकाळी तक्रार तर रात्री न्याय 

बारामती पोलिसां च्या मदतीने ज्येष्ठाना मिळवून दिली हक्काची जमीन

बारामती वार्तापत्र

रविवार 20 जून रोजी सकाळी 8 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात जमीन फसवणुकीची तक्रार घेऊन फलटण तालुक्यातील 11 शिक्षक आले होते अजितदादा च्या सुचनेसुसार तपास करून बारामती शहर पोलिसांनी रविवारीच रात्री सदर शिक्षकांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळवून दिली आहे .
फलटण तालुक्यातील 11 शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर सर्व मिळालेली आयुष्यभर ची रक्कम खर्च करून बारामती शहरातील खंडोबा नगर येथे ग्रुप मध्ये 60 गुंठे जागा विकत घेतली होती. चांगला भाव विकताना येत असल्याने त्यातील 40 गुंठे जागा शहरातील नामांकित ‘तीन एजंट’ च्या माध्यमातून विकली त्या तिघांनी कमिशन तर कमावले व त्याच बरोबर फलटण ग्रुप चा विश्वास संपादित केला.
त्यामुळे फलटण शिक्षक ग्रुप त्या तिघांवर खुश होता आता राहिलेल्या वीस गुंठे विकणे ची जवाबदारी सुद्धा त्या तिघांवर टाकली विश्वास संपादित केलेले तिघांनी 20 गुंठे विकली व त्यातील फक्त 14 लाख रुपये दिले व राहिलेले 1 कोटी 28 लाख 50 हजार उद्या देऊ आज कायम खुश खरेदी (दस्त नोंदणी ) करून द्या असे विश्वासाने सांगितले.

पहिले व्यवहार उत्तम झाल्याने फलटण शिक्षक ग्रुप ने कायम खुश खरेदी करून दिले परंतु काही तासातच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून काय करायचे ते करा , बारामती मध्ये आमचे कोण वाकडे करू शकणार नाही अशी भूमिका घेतली फलटण शिक्षक ग्रुप ने विनंती केली,हात जोडले, कमिशन वाढून देण्याची तयारी दर्शवली,मध्यस्थ घातले, तरी ते तिघे रक्कम देईनात हताश झालेले सर्व वयस्कर शिक्षक अगोदरच रक्तदाब,मधुमेह व विविध व्याधीने त्रस्त होते सदर घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसल्याने यातील काही जणांना बारामती मधील हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल करण्यात आले.

सोमवारी दस्त नोंदणी रीतसर होणार होती त्यामुळे रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात यातील काही जणांनी व्यथा मांडून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली अजित पवार यांनी त्वरित दरबारात उपस्तीत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना सदर रक्कम देऊन टाकण्यास सांगा अशी सूचना केली.

पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे ,फौंजदर बाळासो जाधव,हवालदार गोपाळ ओमासे,पोलीस शिपाई अंकुश दळवी,आबासो चौधर यांनी त्वरित तिघांना पोलीस स्टेशन ला आणून चौकशी केली परंतु प्रतिसाद देत नसल्याने पोलीस खाक्या दाखवताच फसवणूक केल्याची कबुली दिली .

या तिघांना वाचवण्यासाठी अनेकांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली परंतु खाकी वर्दीने चोख काम केले
दरम्यान पंकज जांभुळकर,हारून आत्त्तार,शिवाजी जाधव या तिघांनी अखेर दस्त पलटून देण्याचे लिखित स्वरूपात मान्य केले व पुन्हा फसवणूक करणार नसल्याचे सुद्धा लिहून दिले.

दादांच्या दरबारात रविवारी सकाळी तक्रार व पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री न्याय मिळाल्याने त्या फलटण शिक्षक ग्रुप ने समाधान व्यक्त केले.

चौकट :
फसवणूक किंवा धमकी देऊन खरेदी खत केले असेल तर आशा प्रकरणात अन्याय झालेल्या व्यक्ती बाबत सत्यता असेल तर त्यांना सुद्धा न्याय पोलीस देऊ शकतात हेच या प्रकरणातून दिसून येते अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!