उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीतकोरोना बाबत आढावा बैठक संपन्न
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना सद्य:स्थितीचा आढावा आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला .
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीतकोरोना बाबत आढावा बैठक संपन्न
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना सद्य:स्थितीचा आढावा आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला .
बारामती वार्तापत्र
कोरोना बाबतची आढावा बैठक बारामती येथे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडली . यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे , नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, जिल्हा परिवहन अधिकारी रमाकांत गायकवाड, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा परिषद पुणे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब बारामती यांच्यातर्फे 100 पीपीई किट, 150 एन 95 मास्क आणि 150 सॅनिटायझर पवार यांचे हस्ते रूई रूग्णालय कोव्हिड सेंटर, सिल्वर ज्युबिली रूग्णालय व बारामती नगरपरिषद यांना वितरीत करण्यात आले. तसेच बारामती मधील ऋषिकेश भारत पवार यांस महानेता : विकास आणि परिवर्तन या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याने त्यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते 31 हजारांचा धनादेश देवून त्याचा गौरव करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.