उमेदवारांचा भरला बाजार
तहसिल कचेऱ्या गेल्या गर्दीने फुलून
बारामती वार्तापत्र
राज्यातील 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील फॉर्म भरणाऱ्या ठिकाणांवर बाजार भरल्यासारखी गर्दी आज पहावयास मिळाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे व निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्यास परवानगी दिल्यामुळे ज्या ठिकाणी फार्म भरण्याचे टेबल होते. त्या ठिकाणी गर्दीने आवारा फुलून गेला होता.
सोशल डिस्टंसिंग तर नावालाही नव्हते.अनेक ठिकाणी सोशल डिस्टंस चा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.
सोशल डिस्टंसिंग चे पुरेपूर पालन करत शासनाने ऑफलाईन अर्ज भरण्यास मान्यता दिली होती. मात्र त्याची तमा कोणालाही असल्याचे दिसले नाही.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे व पॅनलची बांधणी करण्याची राजकीय समीकरणे जुळवत फार्म भरले जात होते .त्यामुळे या भावी सदस्यांचे व गाव कारभाऱ्यांची कोरोणाच्या बाबतीतील नियंत्रण कसे असेल यावरही गावोगावी चर्चा झडल्या जात आहेत.