ऊस पीकावरील तांबेरा रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन
पानांच्या दोन्ही बाजूंवर नारिंगी रंगाची पावडर आढळते.

ऊस पीकावरील तांबेरा रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन
पानांच्या दोन्ही बाजूंवर नारिंगी रंगाची पावडर आढळते.
बारामती वार्तापत्र
ऊस पीकावर तांबेरा रोगावर आढळून आल्यास शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन बारामती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
तांबेरा रोगाची लक्षणे:-पानांवर पिवळे व तांबडे ठिपके दिसून ते हळूहळू वाढतात.पानांच्या दोन्ही बाजूंवर नारिंगी रंगाची पावडर आढळते. पाने पिवळी पडून सुकतात.
पारंपारिक उपाय:- रोगग्रस्त उसाच्या कांड्या तात्काळ कापून नष्ट कराव्यात. रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी, लागवडीसाठी निरोगी कांड्यांचा वापर करावा. शेतात पाण्याचा योग्य निचरा ठेवावा. शेतात पाणी साचू देऊ नका रोगग्रस्त बेण्यांचा वापर टाळावा.
रासायनिक उपाय:- अझोक्सिस्ट्रॉबिन + डिफिनेकोनाझोल १६० मिली प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कार्बेन्डाझिम ०.१ टक्के द्रावण फवारणीसाठी वापरावे.
बेणे प्रक्रिया:- उसाच्या कांड्या ५०°C तापमानाच्या गरम पाण्यात २ तास भिजवून ठेवाव्यात. संक्रमित उसातील बुरशी नष्ट करण्यासाठी स्टीम थेरपीचा वापर करावा. उपाययोजना तातडीने राबवून तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव थांबवावा आणि ऊस पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन श्री. हाके यांनी केले आहे.