एकत्र दिवाळीचा 50 वर्षांचा पायंडा यंदा खंडित;शरद पवार गोविंदबागेत; अजित पवार काटेवाडीत
जे ओरिजनल ते ओरिजनल... साहेब ते साहेब... याची सुरुवात साहेबांनी केली
एकत्र दिवाळीचा 50 वर्षांचा पायंडा यंदा खंडित;शरद पवार गोविंदबागेत; अजित पवार काटेवाडीत
जे ओरिजनल ते ओरिजनल… साहेब ते साहेब… याची सुरुवात साहेबांनी केली
बारामती वार्तापत्र
ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिवाळीनिमित्त येथील गोविंदबागेतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटतात. गेल्या पन्नास वर्षांपासून हा पायंडा सुरू आहे.
यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच बारामती मध्ये गोविंद बाग आणि काटेवाडी अशा दोन ठिकाणी पवार कुटुंबाचा पाडवा साजरा करण्यात आला. दोन्ही ठिकाणी समर्थक कार्यकर्त्यांनी दुपारपर्यंत तोबा गर्दी केली होती मात्र यातील काही कार्यकर्ते हे शरद पवारांकडे भेट घेऊन अजित पवारांनाही भेटायला जात होते त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं आमचा स्नेह संपूर्ण पवार कुटुंबावर आहे मात्र दुसरीकडे काही कार्यकर्ते आपापल्या विठ्ठलाबद्दल प्रचंड श्रद्धाळू दिसले.
राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर यंदा बारामतीत दिवाळी पाडव्यालाही दोन वेगवेगळे पाडवे साजरे करण्यात आले. यातला एक गेली 57 वर्ष शरद पवारांसोबत साजरा केला जातो तर गेल्याच वर्षी फुटलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या अजित पवार यांचा पहिला स्वतंत्र पाडवा काटेवाडीच्या बंगल्यात आयोजित करण्यात आला होता. जे ओरिजनल ते ओरिजनल… साहेब ते साहेब… याची सुरुवात साहेबांनी केली होती, अशा प्रतिक्रिया शरद पवारांच्या पाडव्याच्या मांडवात ऐकायला मिळत होत्या.
काटेवाडीत अजित पवारांच्या पाडव्याच्या मांडवात कार्यकर्ते एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत येत होते. दादा यंदा मुख्यमंत्री व्हावेत अशा सदिच्छासुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी दिल्या. इथे मात्र जाणीवपूर्वक शरद पवारांचा उल्लेख केल्यावर कार्यकर्ते अजित पवारांनी केलेल्या विकासाचा उल्लेख करतात नव्या पाडव्याबद्दल बोलायचं टाळतात.
शरद पवारांच्या भेटीनंतर कार्यकर्ते अजित पवारांच्या भेटीला गेले. त्यांनी कुटुंबाबद्दलचा स्नेह बोलून दाखवला. शरद पवारांना जेव्हा सांगितलं गेलं, तेव्हा ते ऐकून अस्वस्थ वाटत असल्याचे पवार म्हणाले. तसेच एकत्र मेळावा झाला असतं तर बरं झालं असतं असं पवार म्हणाले. तर काटेवाडीचा पाडवा मेळावा हा लाभार्थ्यांचा मेळावा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं.
गेल्यावर्षी पर्यंत पवार कुटुंबाची एकत्र साजरी होणारी दिवाळी हा राज्यभर कुतूहलाचा विषय असायचा. ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या कुटुंबांमध्ये त्याचे विशेष अप्रूप होतं. मात्र गेल्या वर्षी राजकारणामुळे कुटुंबात मतभेद झाले, राजकीय पक्ष फुटले आणि आता यंदा पाडवा मेळावाही फुटल्याचे दिसलं. कुटुंब एकत्र राहिली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत अशी धारणा असणाऱ्या सगळ्यांना पवार कुटुंबात साजऱ्या होणाऱ्या दोन पाडव्यांमुळे दुःख वाटतंय मात्र एक गोष्ट नक्की आहे कार्यकर्त्यांनी आपापला विठ्ठल निवडलेला आहे, कुणाचा विठ्ठल उजवा? हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट होईल.