बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टीप्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडीत वाढ
तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टीप्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडीत वाढ
तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला.
बारामती वार्तापत्र –प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टीप्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई-गोवा क्रूजवर 2 ऑक्टोबरच्या रात्री NCB ने धाड टाकून, आर्यन खानच्या पार्टीतील ड्रग्जचा भांडाफोड केला. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं. यावेळी NCB कडून अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांनी आर्यनच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. तर आर्यन खानकडून वकील सतीश मानेशिंदे यांनी युक्तीवाद केला.
ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेली एका दिवसाच्या कोठडीची मुदत सपंल्यानंतर आर्यन खानला काल 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला.