एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीची आढावा बैठक संपन्न
सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे चांगल्या दर्जाची करावीत.
एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन
समितीची आढावा बैठक संपन्न
सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे चांगल्या दर्जाची करावीत.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च 2022 रोजी प्रशासकीय भवन येथील सभागृहामध्ये पार पडली.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, सा. बां. वि. उपअभियंता राहूल पवार, समितीचे सदस्य सुशांत जगताप, मंगेश खताळ, रमेश इंगुले, अनिता गायकवाड, बाबासाहेब परकाळे, शिवाजीराव टेंगळे, निखिल देवकाते, सर्व विभागाचे अधिकारी,प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
बैठकीत विविध विकास कामांवर चर्चा झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. होळकर म्हणाले की, बारामती तालुक्यासह शहरात विविध विकास कामे चालू आहेत. प्रत्येक काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे चांगल्या दर्जाची करावीत. विकास कामांमध्ये काही अडचणी येत असतील तर संबंधित विभागांनी त्या आढावा बैठकीत मांडाव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.