क्राईम रिपोर्ट

दौंड पोलीस धडक कारवाई चोरीच्या चार दुचाकी जप्त, चार गुन्हे उघडकीस तर एक आरोपी जेरबंद

गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेत

दौंड पोलीस धडक कारवाई चोरीच्या चार दुचाकी जप्त, चार गुन्हे उघडकीस तर एक आरोपी जेरबंद

गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेत

क्राईम;बारामती वार्तापत्र

दौंड पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने धडक कारवाई करत मोटरसायकल चोरीतील एक आरोपी जेरबंद करत त्याचेकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत, आरोपीने सदरच्या दुचाकी कोंढवा, लोणी काळभोर, दौंड या भागातून चोरल्या असल्याची कबुली दिली आहे.

दि.०७/१२/२०२१ रोजी दौंड शहरातील नगर मोरी चौकातून एक दुचाकी चोरी झाले बाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने दौंड डी बी पथक तपास करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेत एक संशयिताला केडगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचेकडून आत्तापर्यंत एकुण चार दुचाकी जप्त करण्यात डी बी पथकाला यश आले आहे, डी बी पथकाने मिळून आलेल्या इतर दुचाकी बाबत संबंधीत पोलीस ठाण्यांकडे चौकशी केली असता त्या ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी, पो.हवा. सुभाष राऊत, पो.ना अमोल गवळी, पो.ना आदेश राऊत, पो.ना आमिर शेख, पो.ना निखिल जाधव, पो.कॉ अमोल देवकाते, पो.ना अभिजित गिरमे यांनी केली असून गुन्हयाचा अधिक तपास पोलीस नाईक आमिर शेख हे करीत आहेत.

Back to top button