एक ऑगस्ट रोजी बारामतीत लोक अदालतीचे आयोजन ! वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या कोर्ट प्रकरणांसाठी सुवर्ण संधी !
लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत

एक ऑगस्ट रोजी बारामतीत लोक अदालतीचे आयोजन ! वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या कोर्ट प्रकरणांसाठी सुवर्ण संधी !
लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत
बारामती वार्तापत्र
जिल्हा न्यायालय बारामती, व वकील बार असोसिएशन यांचे विदयमाने रविवार दिनांक ०१/०८/२०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदलात आयोजित करण्यात आलेली आहे.
वर्षानुवर्ष चालणारे पेंटिंग केसेस या लोक अदालत मुळे मार्गी लागतात या लोकन्यायालयाचे फायदे पुढील प्रमाणे
केसचे झटपट निकाल लागतो.
तोंडी पुरावा-उलटतपासणी-दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात.
लोकन्यायालयाच्या निवड्याविरूध्द अपील नाही एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते.
लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना सोनाचा हार.
लोकन्यायालयाचा निवडा दोन्ही पक्षाना समाधान देतो.
परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील व्देष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही.
कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमानेच लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते.
वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते.
लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.






