स्थानिक

एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा अभिनव उपक्रम पिंपळी-लिमटेक गावात संपन्न झाला

इंधन दरवाढ ही सध्या सामान्य जनतेला न परवडणारी

एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा अभिनव उपक्रम पिंपळी-लिमटेक गावात संपन्न झाला

इंधन दरवाढ ही सध्या सामान्य जनतेला न परवडणारी

बारामती वार्तापत्र

पद्मविभूषण शरद पवार यांना अपेक्षित असलेल्या विचारांचा कार्यकर्ता तयार करून नव्या विचारांनी प्रेरित होऊन काम करणारे कार्यकर्ते तयार होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ही संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे मार्गदर्शनाने पिंपळी ग्रामपंचायत समोरील प्रांगणात “एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता.

या उपक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाणपाटील यांनी केले. तर स्वागत हरिभाऊ केसकर यांनी केले.
मागील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना सरसकट ६८०० हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी व वीजबिल माफी करण्यात आली होती त्याच धर्तीवर शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोड थांबविणे, वीज बिल सवलत,लोड शेडिंग कमी करणे,वीज बिल माफी कर्जमाफी आदी समस्यांवर चर्चा करून तसा ठराव ग्रामपंचायतीच्या वतीने शासन दरबारी पोहचविण्यासाठी करण्याचे ठरले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पिंपळी गाव अध्यक्ष, युवक गाव अध्यक्ष,सोशल मिडिया गाव अध्यक्ष,महिला गाव अध्यक्ष तसेच बूथ कार्यकर्ता नेमणूकी विषयी चर्चा करण्यात आली तसेच सर्वांनी अंतर्गत गटतट न ठेवता गाव पातळीवर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात चर्चा विनिमय करण्यात आल्या.

त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील पिंपळी गावासह सर्वच गावामध्ये पक्षाच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. पिंपळी-लिमटेक गावामधील सर्व कामे वेळेवर व दर्जेदार करून घेण्याचे देखील ठरले व ज्याठिकाणी निधी कमी पडत असेल तिथे निधीसाठी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करण्यासंदर्भातील चर्चा झाल्या.

तसेच केंद्र सरकार मार्फत ईडी यंत्रणेचा होत असलेला दुरुपयोग व महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून मिळत नसलेला जी.एस.टी. परतावा रक्कम मिळत नसल्याने वाढत्या विकासात्मक समस्या, वाढते पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ केंद्र सरकारने कमी करण्यासंदर्भातील चर्चा उपस्थित नागरिकांकडून आल्या. इंधन दरवाढ ही सध्या सामान्य जनतेला न परवडणारी असून सामान्य नागरिकांना जीवन मुश्कील झाले आहे केंद्र सरकार इंधन दरवाढ कमी करत नसल्यास वेळोप्रसंगी निदर्शने-आंदोलने करण्यात यावी अशा उपस्थित नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील,खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसो भिसे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेशराव ढवाणपाटील,बारामती तालुका सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर,ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच देवेंद्र बनकर,सदस्य आबासाहेब देवकाते पाटील,अजित थोरात,नामदेवराव मेरगळ,तालुका सोशल मीडियाचे सरचिटणीस सूर्यकांत पिसाळ,युवा सामाजिक कार्यकर्ते कल्याण राजगुरू,बापूराव यादव,दिलीप ठेंगल,आबासो देवकातेपाटील,आनंदराव आगवणे रामचंद्र बनकर सर,तुळशीदास केसकर, राजकुमार गायकवाड धनाजी जाधव आदींसह कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram