‘एक दिवस गावासाठी’ बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे उपक्रम
श्रमदान चळवळीत सर्व युवकांनी सहभागी

‘एक दिवस गावासाठी’ बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे उपक्रम
श्रमदान चळवळीत सर्व युवकांनी सहभागी
बारामती वार्तापत्र
अंजनगाव येथे ‘एक दिवस गावासाठी’ या भावनेने प्रेरित होऊन गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ६) सकाळी एकत्र येऊन सामाजिक कार्याचा प्रारंभ केला.
या वेळी भैरवनाथ पालखी विसावा स्थळाच्या परिसराची स्वच्छता केली. गवत आणि कचरा साफ करून परिसर स्वच्छ केला. यानंतर शेजारील पीर साहेब दर्याचीही सफाई केली. सर्वधर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवला गेला.
श्रमदानानंतर सर्व तरुण व ग्रामस्थांना संतोष परकाळे यांच्या वतीने चहा आणि अल्पोहार दिला या वेळी युवाशक्तीने उभारलेल्या या श्रमदान चळवळीत सर्व युवकांनी सहभागी होऊन अंजनगाव स्वच्छ आणि सुंदर बनवूया, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी नवनाथ परकाळे, सूर्यकांत मोरे, मिलिंद मोरे, बापूराव सस्ते, संजय परकाळे, मंगेश वायसे, विजय परकाळे, वैभव मोटे, नेमजी वायसे, जगदीश परकाळे, राहुल परकाळे, प्रशांत परकाळे, शकूल मोरे, हनुमंत पवार, दत्तू वायसे, राजू वायसे आणि धनंजय वायसे ,प्रशांत कुचेकर आदी उपस्थित होते.






