स्थानिक

एक लाख रुपयाला ,32 लाख रुपये व्याज,,,मात्र तरीही सावकाराचं पोट भरेना !

लाकडी तालुका इंदापूर येथील घटना

एक लाख रुपयाला ,32 लाख रुपये व्याज,,,मात्र तरीही सावकाराचं पोट भरेना !

लाकडी तालुका इंदापूर येथील घटना

बारामती वार्तापत्र
आईच्या आजारपणासाठी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे लाकडी येथील शेतकऱ्याने सावकाराकडून एक लाख रुपये आई च्या उपचारासाठी व्याजाने घेतले मात्र वरचेवर बत्तीस लाख रुपये वसूल करूनही सावकाराने खरेदीखत करून घेतलेली जमीन परत देण्यासाठी आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली.

लाकडी ,तालुका इंदापूर येथील नामदेव रामचंद्र ढोले वय 50 राहणार लाकडी तालुका इंदापूर या शेतकऱ्याला त्याच्या आईसाठी दवाखान्यात उपचारासाठी आरोपी महादेव उर्फ बिट्टू सांगळे राहणार जळोची यांच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले .त्याबदल्यात बिट्टू सांगळे याने ढोले यांच्या भावाचे नावची दीड एकर जमीन नावावर करून घेतली 2016 ते 2018 पर्यंत बिट्टू सांगळे यास सुमारे बत्तीस लाख रूपये रोखीने व्याज व मुद्दल स्वरूपात दिले. तरीही सावकाराचा तगादा चालू होता.

बिट्टू सांगळे याचे पैसे देण्यासाठी म्हणून मल्लेश कंदरापुरकर राहणार पिंपरी जिल्हा पुणे याच्याकडून चार लाख 85 हजार बँक खात्यामार्फत घेतले व या बदलात कंदरापूरकर याला दोन एकर जमीन गहाण ठेवली होती व आणखीन पाच लाख 15 हजार रुपये करापुरकर यांनी बँकेमार्फत ढोले यांना व्याजाने दिले व सदरच्या दोन एकर जमिनीचे खरेदीखत करून घेतले. त्या बदल्यात आलेले सर्व पैसे ढोले यांनी सावकार बिट्टू सांगळे यास दिले व पूर्वी सांगळे यास दिलेली जमिनीचे खरेदीखत पलटून द्यावे अशी मागणी केली.

मात्र तरीसुद्धा बिट्टू सांगळे यांनी जमीन पलटून दिली नाही दरम्यान करापुरकर याचे 10 टक्के व्याजाने पैसे भरून कदरापुरकर च्या दहा लाखाच्या बदल्यात सुमारे बावीस लाख रुपये व्याज भरले त्यामुळे परिस्थिती आणखी खालावुन ढोले यांनी त्यांच्या नावाची साडेसहा एकर जमीन रायचंद पांडुरंग वनवे व त्यांच्या भाऊ यांना रीतसर किंमत 36 लाख 90 हजार रुपये किमतीला विकून आलेले पैसे बावीस लाख बिट्टू सांगळे यास व्याजाचे दिले व 14 लाख 90 हजार रुपये करापुरकर यास व्याजाचे बदल्यात दिले.

मात्र एवढी रक्कम दिली तरीसुद्धा या दोघांनी घेतलेली जमीन पलटून दिली नाही व आणखी व्याजाचे पैसे आहेत असे म्हणून ढोले यास त्रास देत आहेत व आणखी दोन लाख रुपये बिट्टू सांगळे मागत आहे तर करापुरकर वीस लाख रुपये व्याजाचे द्या तरच तुमच्या जमिनी परत देतो असे म्हणत आहे.

करापुरकर व बिट्टू सांगळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून वडिलोपार्जित जमीन विक्रीसाठी वारसाची सहमती नसतानाही ही जमीन परस्पर प्रभाकर पांडुरंग भांड राहणार बोरी ता इंदापूर यास विकली आहे या सावकारी पैशाच्या वसुलीसाठी 1)भास्कर काशिनाथ वनवे ,2)दत्तात्रय राजाराम वनवे ,3)बिबीशन जयसिंग ढोले सर्व राहणार लाकडी तालुका इंदापूर येथील असून हे तिघे जण सावकाराच्या वसुलीसाठी फिर्यादी बारामती भागात आल्यावर व्याजाच्या पैशासाठी मुलगा दिपक नामदेव ढोले यास जबरदस्तीने कदरापुरकर यांचे चारचाकी फॉर्च्युनर गाडी नंबर एम एच 14 81 82 गाडी घेऊन येऊन वारंवार मारहाण व शिवीगाळ करत आहेत.

हे सर्व लोक बारामती येथील तीन हत्ती चौकात कॅनॉल वर बसून असतात. माझ्या मुलाच्या मोबाईलवर वेळोवेळी बिट्टू सांगळे व करापुरकर व त्यांचे हस्तक हे वेळोवेळी त्रास देत आहेत. त्या पद्धतीचे रेकॉर्डिंगही आमच्याकडे आहे. असे फिर्यादी नामदेव ढोले यांनी सांगितले आहे. वरील सर्व आरोपी मुळे ढोले यांची 11 एकर जमीन तारण ठेवून सावकारांना व्याज दिले आहे. त्यामुळे त्यांची 11 एकर जमीनही अडकून पडले आहे त्यामुळे वरील आरोपींविरोधात बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!