स्थानिक

एमआयडीसीने घेतला अटी शर्तींचा भंग केलेल्या कंपनीकडून भूखंडाचा ताबा

भूखंडाचा पंचनामा करून महामंडळाने सदर भूखंडाचा रितसर ताबा परत

एमआयडीसीने घेतला अटी शर्तींचा भंग केलेल्या कंपनीकडून भूखंडाचा ताबा

भूखंडाचा पंचनामा करून महामंडळाने सदर भूखंडाचा रितसर ताबा परत

बारामती वार्तापत्र

भाडेपट्टा करारनाम्याने वाटप केलेल्या भूखंडाच्या अनुषंगाने अटी व शर्तींचा भंग केल्याने मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंड परत ताब्यात घेतला आहे.

मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांना महामंडळाने ५ नोव्हेंबर २००९ रोजी भाडेपट्टा करारनाम्याद्वारे भूखंड वाटप केला होता.

महामंडळाच्या भाडेपट्टा करारनामा मधील अटी व शर्ती भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचा करारनामा रद्द करण्याबाबत टर्मिनेशन नोटीस महामंडळाकडून १६ जानेवारी २०२५ अन्वये बजावण्यात आलेली होती.

त्यानुसार आज (८ एप्रिल) या भूखंडाचा पंचनामा करून महामंडळाने सदर भूखंडाचा रितसर ताबा परत घेतलेला आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Back to top button