
एमआयडीसी मधील एस टी च्या स्क्रॅप यार्डस आग
2 तासात शर्तींचे प्रयत्न करून आग आटोक्यात
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी मधील एसटी महामंडळ च्या विभागीय कार्यशाळा च्या स्क्रॅप यार्डस सोमवार 26 जुलै रोजी दुपारी 1 वाजून 30 मि च्या सुमारास आग लागली होती.
बारामती औद्योगिक वसाहत मधील अग्निशामक दलाच्या जवानांनी 2 तासात सदर आग आटोक्यात आणली या वेळी फायर ऑफिसर उमेश संधानशिव,चालक रमेश शिंदे,ऑपरेटर विशाल चव्हाण,फायरमण आनंद साळुंके, प्रवीण पवार आदी जवानांनी 2 तासात शर्तींचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
स्क्रॅप यार्ड मध्ये भंगार माल एसटी ने दुसऱ्या पार्टीस विकला होता त्या पार्टीकडून गॅस कटरने भंगार माल चे तुकडे करताना ठिणगी पडून आग लागली मोठ्या प्रमाणात रबर सारखे पदार्थ असल्याने आग झपाट्याने पसरली परंतु तात्काळ अग्निशामक दलास पाचारण केल्याने सदर आग आटोक्यात आली व एसटी महामंडळ चे कोणतेही वित्त व जीवित हानी झाली नसल्याचे विभागीय कार्यशाळा चे सहायक यंत्र अभियंता सर्जेराव येळे यांनी सांगितले.
चौकट
दुसऱ्या पार्टीस माल विकल्यावर सदर पार्टीने विभागीय कार्यशाळा च्या आवाराच्या बाहेर भंगार माल किंवा एसटी बसेस नेऊन तोडाव्यात आत मध्ये तोडू नये जर आग पसरली असती तर काही अंतरावर टायर व विविध प्रकारचे ऑइल व विभागीय भांडार आहे व पाठीमागील बाजूस माळेगाव संस्थेची अधिकारी निवास व्यवस्था व इतर रहिवासी परिसर आहे त्याचे नुकसान झाले असते त्यावेळी त्यास जवाबदारी कोण ?
त्या मुळे या नंतर एसटी महामंडळ ने खबरदारी घ्यावी अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे रहिवासी महेश सातपुते व रमेश काळे , व इतर रहिवासी यांनी केली आहे