स्थानिक

एम.पी.एस.सी. मधील घवघवीत यशाबद्दल प्रतिक्षा जगताप हिचा नागरी सत्कार उत्साहात संपन्न

भव्य मिरवणूक व मान्यवरांच्या हस्ते सत्कार

एम.पी.एस.सी. मधील घवघवीत यशाबद्दल प्रतिक्षा जगताप हिचा नागरी सत्कार उत्साहात संपन्न

भव्य मिरवणूक व मान्यवरांच्या हस्ते सत्कार

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरासाठी अभिमानास्पद ठरलेल्या यशाची नोंद घेत कु. प्रतिक्षा घनश्याम जगताप हिचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. बारामती येथील प्रशासकीय कार्यालयात मुद्रांक विक्रेते म्हणून कार्यरत असलेले मा. घनश्याम उर्फ बाळासाहेब शिवाजी जगताप यांची कन्या प्रतिक्षा हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत मंत्रालयातील ‘कक्ष अधिकारी’ (Section Officer – Gazetted Officer) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे.

कष्ट, चिकाटी, सातत्य आणि प्रबळ जिद्दीच्या जोरावर प्रतिक्षाने हे यश मिळवले असून तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भव्य मिरवणूक व मान्यवरांच्या हस्ते सत्कार शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी बारामती येथील श्रावण गल्ली ते सिद्धेश्वर मंदिर या मार्गावर प्रतिक्षाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीनंतर बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. सचिनशेठ सातव यांच्या हस्ते तिचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष सचिनशेठ सातव यांनी प्रतिक्षाचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की, “तुझ्या यशाचा संपूर्ण बारामती शहराला अभिमान आहे. तू इथेच न थांबता भविष्यात कलेक्टर पदापर्यंत झेप घेशील, हीच अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष मा. सचिनशेठ सातव यांच्यासह
नगरसेविका मा. मंगलकाकी शिवाजी जगताप,बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सौ. अनिताताई गायकवाड, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सचिव मा. रेहाना शेख,तहसील कार्यालयातील विविध पदाधिकारी,जगताप कुटुंबीयांचे मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. ज्योती जगताप व नीलेश घोडके यांनी प्रभावीपणे केले.विविध संस्थांकडून गौरवयाशिवाय कारभारी अण्णा फाउंडेशनच्या वतीने मा. प्रशांतनाना सातव यांनी गदिमा सभागृहात प्रतिक्षाचा सत्कार केला.

राष्ट्रवादी भवन यांच्या वतीनेही तिचा विशेष सन्मान करण्यात आला.विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी प्रतिक्षाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मंगल ससाणे, प्रा. अमित दिव्हारे, प्रा. डॉ. जगदीश सांगवीकर यांनीही तिचा सत्कार केला.

पूर्वीची यशस्वी वाटचाल प्रतिक्षाने यापूर्वी २०२४ मधील एम.पी.एस.सी. परीक्षेत सलग तीन पदांसाठी निवड मिळवली होती.

त्यामध्येअसिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर,
नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी या पदांचा समावेश होता.
या पदांपैकी तिने स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पद स्वीकारले असून सध्या ती जी.एस.टी. भवन, मुंबई येथे कार्यरत आहे. नोकरी सांभाळतच तिने पुढील अभ्यास सुरू ठेवून कक्ष अधिकारी (Section Officer) हे पद प्राप्त केले, हे तिच्या मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी व मार्गदर्शनप्रतिक्षाने बारामती येथील शारदानगरच्या शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (अ‍ॅग्री) ही पदवी प्राप्त केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिने कारभारी अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका,विद्या प्रतिष्ठान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे मार्गदर्शन घेतले.

तिच्या यशामध्ये विविध मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा असून त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व एम.पी.एस.सी.चे माजी सदस्य डॉ. अरुण अडसूळ,
उपजिल्हाधिकारी मा. श्री. हनुमंतराव पाटील,स्टेट टॅक्स सहायक आयुक्त मा. निरंजन कदम,राष्ट्रवादी भवन करिअर अकॅडमीचे संकल्प देशमुख व समीर मुलाणी,शाश्वत अकॅडमीचे महेश पाटील,मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे सचिन ढवळेयांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

मा. शरदचंद्रजी पवार तसेच उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनीही प्रतिक्षाच्या यशाबद्दल तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रतिक्षाच्या या यशामुळे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते—स्वप्न मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक ठेवा, यश नक्की मिळते.आपल्या यशाबद्दल बोलताना प्रतिक्षा म्हणते की, सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते.

Back to top button