मुंबई

स्वप्नीलच्या कुटुंबियांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रुपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नीलच्या वडिलांकडे सुपूर्द

सरकार असंवेदनशील, देवेंद्र फडणवीसांची टीका

स्वप्नीलच्या कुटुंबियांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रुपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नीलच्या वडिलांकडे सुपूर्द

सरकार असंवेदनशील, देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई : बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. स्पप्नीलच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अशावेळी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भाजपकडून स्पप्नील लोणकरच्या कुटुंबियांचं कर्ज फेडण्यात आलं आहे. स्वप्नीलच्या कुटुंबियांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रुपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नीलच्या वडिलांकडे सुपूर्द केला.

स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांच्यावर 19 लाख 96 हजार 965 रुपयांचं कर्ज होतं. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचं कर्जाची परतफेड आज भाजपकडून करण्यात आली. हाताशी आलेल्या पोराची आत्महत्या, त्यात घरातील प्रिंटिंग प्रेस बंद आणि कर्जफेडीसाठी पतसंस्थेनं लावलेला तगादा यामुळे स्वप्नीलचं कुटुंब त्रस्त झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नामुळे भाजपकडून स्वप्नीलच्या कुटुंबाचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. आज देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुनीण लोणकर यांच्याकडे कर्जाच्या संपूर्ण रकमेचा धनादेश भाजपकडून सुपूर्द करण्यात आला आहे.

सरकार असंवेदनशील- फडणवीस

आपल्या सर्वांना कल्पना आहे की कर्ज उरावर असताना लोणकर यांचा हातचा मुलगा गेला. त्यांचं कर्ज फेडण्याचा निर्णय भाजपनं घेतला. त्यासाठी प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेतला. खरं तर सरकारनं तत्त्काळ मदत करणं अपेक्षित होतं. एवढी मोठी घटना घडली. सभागृहातही याबाबत चर्चा झाली. पण सरकार संवेदनशील नाही, याचं वाईट वाटतं. ही पतसंस्था ज्या पक्षाची आहे त्यात मला जायचं नाही. पण सरकारकडून मदत करणं शक्य होतं ते झालं नाही. थोडंफार कर्ज माफ करता आलं असतं तर लोणकरांना जास्त मदत करता आली असती, असं मत यावेळी फडणवीसांनी व्यक्त केलं. दरम्यान, भाजपकडून कर्जाची परतफेड करण्यात आल्यानंतर सुनील लोणकर यांना अश्रू अनावर झाले होते.

प्रवीण दरेकरांनी शब्द पाळला

यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, यापूर्वी घरी जाऊन स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची 14 जुलै रोजी भेट घेतली होती. त्यावेळी मी शब्द दिला होता की भाजप नक्की मदत करेल. आज स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांवर अशलेल्या 19 लाख 96 हजार 965 रुपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश भाजपच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोणकर कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. याचा मीही साक्षीदार ठरलो. एकीकडे ‘शब्दाला जागणारी’ भाजप आणि दुसरीकडे ‘शब्द फिरवणारे’ महाविकास आघाडी सरकार! अशी टीका दरेकर यांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!