राजवर्धन दादा युवा मंच बावडा या पहिल्या शाखेचे उद्घाटन येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न
सर्वांच्या सुखदुःखात अडीअडचणीत मदत करण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले.

राजवर्धन दादा युवा मंच बावडा या पहिल्या शाखेचे उद्घाटन येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न
सर्वांच्या सुखदुःखात अडीअडचणीत मदत करण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर:- बारामती वार्तापत्र
बावडा, दत्तनगर येथे राजवर्धन पाटील युवा मंच, या पहिल्या शाखेचे उद्घाट निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बावडा गावचे विद्यमान सरपंच किरण पाटील, विकास पाटील, राजवर्धन पाटील युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष शाहरुख शेख, अध्यक्ष आशिष सरवदे, उपाध्यक्ष इब्राहिम शेख, कार्याध्यक्ष अजित जाधव, शशिकांत जाधव उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया इंदापूर तालुका, रनजीत घाडगे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पवार, सुरज माने व मोठ्या प्रमाणात युवक वर्ग उपस्थित होता.
यावेळी राजवर्धन दादा पाटील म्हणाले की युवकांनी अशाप्रकारे संघटित होऊन समाज उपयोगी कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे व समाजासाठी आपण जास्तीत जास्त कार्य करावे असे सर्वाना आव्हान केले. सर्वांच्या सुखदुःखात अडीअडचणीत मदत करण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले. यावेळी सुत्रसंचालन मा. शशिकांत जाधव, उपाध्यक्ष भारतीय जनता सोशल मीडिया इंदापूर तालुका यांनी केले. यावेळी किरण काका पाटील, गणेश मासाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली,हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे.