एसटी चे शासनात विलीनीकरण होणारच: ॲड.गुणरत्न सदावर्ते
बारामती मध्ये पवार काका पुतन्यावर जोरदार टीका
एसटी चे शासनात विलीनीकरण होणारच: ॲड.गुणरत्न सदावर्ते
बारामती मध्ये पवार काका पुतन्यावर जोरदार टीका
बारामती: वार्तापत्रक
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी सुरु असलेल्या लढ्यात कामगारांची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या एडवोकेट गुल रत्न सदावर्ते यांनी बारामती एसटी कामगारांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करत चौफेर टीका केली.
शरद पवार स्वयंघोषित कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे आराध्यदैवत म्हणून घेणारे शरद पवार कामगार आणि कष्टक-यांचे आराध्य दैवत नाही. असा ठराव बारामतीतल्या लोकांनी बहुमताने केला.
त्याचं कारण असं की शेजारच्या राज्यात सात एसटीचा कर्मचारी मृत्युमुखी पडले तर राज्य बंद करायला निघालेल्या या लोकांना आतापर्यंत 60 एसटी कामगारांच्या मृत्युनंतर साध्या संवेदनाही व्यक्त करता आल्या नाहीत. पवार कुटुंबातील एकही व्यक्ती त्या एसटी कामगारांच्या घरी जाऊन सांत्वन करू शकला नाही. त्यामुळे उपचारांचाही कष्टकऱ्यांची आराध्य दैवत म्हणून घेणे बंद करावे.
हाच संदेश राज्यभर पोचवण्यासाठी दौरे सुरू आहेत. एसटी महामंडळाच्या न्यायालयीन लढाईत सर्व तयारी झालेली आहे उद्या त्यावर सुनावणी होईल. राज्य सरकारने लांडीलबाडी न करता सुनावणीला सामोरे जावे. एसटी कामगारांना मेस्मा काय लावून निलंबन करण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत असा देखील खुलासा एडवोकेट सदावर्ते यांनी केला.
आम्ही शिळी भाकरी खाऊन 92 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत आहोत. राज्य सरकारने कितीही निष्णात वकील आणले तरी एसटी महामंडळाचे विलिनीकरण करावेच लागेल, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावले.