एस.व्ही.पी.एम. माळेगाव (बु) फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘जी-पॅट २०२ २’ या परीक्षेत घवघवीत यश
हि परीक्षा दर वर्षी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल टेस्टिंग एजेंसी मार्फत घेतली जाते.
एस.व्ही.पी.एम. माळेगाव (बु) फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘जी-पॅट २०२ २’ या परीक्षेत घवघवीत यश
हि परीक्षा दर वर्षी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल टेस्टिंग एजेंसी मार्फत घेतली जाते.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाचे १९ विद्यार्थी ‘जी-पॅट ‘ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यशस्वी झाले आहेत. औषध निर्माण विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी हि परीक्षा महत्वाची मानली जाते. ‘जी-पॅट ‘ हि परीक्षा दर वर्षी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल टेस्टिंग एजेंसी मार्फत घेतली जाते. विशेषतः हि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास दरमहा विद्यावेतन ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन – नवी दिल्ली (एआयसीटीई ) या संस्थेद्वारे दिले जाते.
‘जी-पॅट ‘ या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे – ओंकार सोळंके, अमृता गायकवाड, दीपक सुरवसे, सौरभ वडघुले, सौरभ इंगळे, श्रध्दा तिकटे, पूजा सावंत., प्रतीक्षा पवळ, प्रणिता माने, अभिजीत भोंडवे, सोमेश्वर चोरमले, केतन घोडे, रोहित काळे, विवेक पवार, दिपाली गायकवाड. रेश्मा लांडे, कल्याणी सोनावणे, सुरज कामदी, आणि नेहा पिल्ले.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष मा. बाळासाहेब तावरे, सर्व विश्वस्त, सचिव मा. प्रमोद शिंदे, प्राचार्य डॉ. आर. बी. जाधव व ‘जी-पॅट ‘ परीक्षा समन्वयक डॉ. . काळे आर. एन. यांनी केले