ऐन निवडणुकीच्या तोंडावर बारामतीमध्ये खळबळ राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
इंस्टाग्राम वरून पीडित मुलीशी ओळख

ऐन निवडणुकीच्या तोंडावर बारामतीमध्ये खळबळ राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
इंस्टाग्राम वरून पीडित मुलीशी ओळख
बारामती वार्तापत्र
बारामती मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.या नेत्याने इंस्टाग्राम वरून ओळख करून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना बारामतीमधील एमआयडीसीमध्ये घडली आहे.
एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२५ रोजी इंस्टाग्राम वरून पीडित मुलीशी ओळख निर्माण करून तिला चॉकलेट तसेच वेगवेगळ्या गिफ्ट देऊन तिची ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून घराजवळील शेडजवळ आरोपीने तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीचे नाव अभिजित….असून एमआयडीसी परिसरातील असून त्याच्यावर बारामती शहर पोलिसांनी येथे गु.र.नं 383/2025 BNS 69,64(2) (एम), 65 (1), अ जा ज अप्र का क 3(1)(r), 3(1) (w) posco 4,6,8,12 अंतर्गत पोलिस हवालदार खेडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास भट्टे करत आहेत.