क्राईम रिपोर्ट

ऑनलाईन वेबसाईडवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकून फसवणूक करणारा गजाआड

बारामती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ऑनलाईन वेबसाईडवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकून फसवणूक करणारा गजाआड

बारामती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बारामती वार्तापत्र
टाईम्स २४ न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून ओएलएक्स (OLX ) व इतर ऑनलाइन वेबसाईटवर विक्रीसाठी कारचे फोटो टाकून फसवणूक करणारा महेंद्र मच्छिंद्र कदम ( वय ३१ ) मूळ रा.काटी. ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद सध्या रा.देसाईवस्ती बेलवाडी ता.इंदापूर जि.पुणे ) यास बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.

या आधी पण त्याने सोलापुरातील एका हॉस्पिटल संदर्भात व्हिडिओ व्हायरल करून मोठी खळबळ उडवून दिली होती. त्या प्रकरणात सुद्धा त्याने पत्रकार असल्याची थाप मारली होती.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की…

महेश मच्छिंद्र कदम (वय ३१वर्षे मुळ रा. काटी ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद )सध्या रा. देसाईवस्ती बेलवाडी ता. इंदापुर जि.पुणे याने व फरारी आरोपी क्र. २) प्रियांका पांडुरंग जाधव रा. एम.आय.डी.सी. ता.बारामती जि.पुणे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रियंका जाधव यांच्या नावावर असलेली मारुती सुझुकी कंपनीची व्हॅगन आर VXI 1.2 मॉडेलची कार तिचा नंबर MH-13-DL-7333 असा असलेली कार ही OLX या ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी फोटो व माहीती अपलोड करण्यात आली. या प्रकरणातील फिर्यादी वैभव सदाशिव लाटे (वय वर्ष 45 रा. उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा) यांना सदर कार खरेदी करायची होती.त्यामुळे त्यांनी आरोपी महेश कदम यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा कदम याने त्यांना बारामती येथे बोलवल्याने दिनांक १३/०८/२०२१ रोजी फिर्यादी यांचे भाऊ सुधाकर लाटे तसेच त्यांचे मित्र असे तिघेजण बारामती येथे गेले.

आरोपी कदम याने त्याचेकडील कारमध्ये बसवुन गाडीची ट्रायल देवुन व गाडीचे कागदपत्रे दाखवली.नंतर फिर्यादी व आरोपी यांचेमध्ये सदर गाडीचा ५ लाख रुपये रकमेला व्यवहार ठरला त्यातील ४ लाख रु त्याच दिवशी व उरलेली १ लाख रू रक्कम ही गाडी खरेदीवी सर्व प्रोसेस झालेनंतर देण्याचे ठरले .

त्यांनतर वैभव लाटे सुधाकर लाटे ,त्यांचा मित्र व आरोपी कदम हे सर्वजण स्टेट बँक ऑफ इंडीया, भिगवण रोड शाखा बारामती या ठिकाणी गेले. कदम याने सांगितल्याप्रमाणे दुसरी संशोधक रोटी प्रियंका जाधव यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यात आली.

आरोपी प्रियंका यांच्या अॅक्सीस बँक शाखा, कन्ना चौक सोलापुर मधील खाते कं. ९१६०१००६८१२३३६४ या खात्यावर फिर्यादी लाटे यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा उंब्रज शाखेतील खाते नंबर ३१४१८२०४४५६ मधील दि. १३/०८/२०२१ रोजी आर. टी. जी. एस. व्दारे ४,००,०००/- रूपये ट्रान्सफर केले व त्यानंतर सदर आरोपी अ.नं. १ याने फिर्यादी व साक्षीदार यांना त्याचेकडील नमुद वाहनात बसवुन घेवुन बारामती येथील नविन प्रशासकिय भवन येथील माऊली झेरॉक्स सेंटर येथे जावुन त्या ठिकाणी गाडीचे व्यवहाराची नोटरी करण्यास सुरवात केली.
थोड्या वेळानंतर आरोपी महेश कदम याने फिर्यादी व साक्षीदार यांना प्रियंका जाधव हिला सही करणेसाठी घेवुन येतो असे सांगुन त्या ठिकाणाहून MH-13-DL/7333 ही गाडी घेवुन गेला. तो परत आलाच नाही.
फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यास त्याचे मोबाईल कं. ९१३०२२७३३३ यावर अनेकवेळा फोन लावले परंतु त्याने फोन उचलले नाहीत. त्यानंतर दुपारी ४:३० वा.फिर्यादी व साक्षीदार यांनी अॅक्सिस बँक बारामती येथे जावुन आरोपी कं. २ हीचे खातेवर आरोपी कं. १ याने सांगीतले प्रमाणे आर. टी. जी. एस. केलेल्या ४,००,०००/- रु रकमेबाबत चौकशी केली असता सदर खात्यावरून सर्व रक्कम विड्रॉल केल्या बाबत सांगीतले .
त्यानंतरही तक्रार देईपर्यंत फिर्यादी व साक्षीदार आरोपीस फोन व्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आरोपी हा त्यांचा फोन रिसीव्ह करत नव्हता तेंव्हा फिर्यादी व साक्षीदार यांची आरोपी कदम व जाधव यांनी संगनमत करून फसवणुक केली असल्याचे लक्षात आले.

बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं ४३५ / २०२१ भा.दं.वि.क. ४२०, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर करीत आहेत.

संशयित आरोपी महेश मच्छिंद्र कदम वय ३१ वर्षे मुळ रा. काटी ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद सध्या रा. देसाईवस्ती बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे हा लोकांना गाडी विकताना मी टाईम २४ न्युज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक आहे असे सांगुन लोकांचा विश्वास संपादन करून लोकाना विश्वसात घेवुन त्यांची फसवणुक करीत आहे.

पोलिसांनी केलं आवाहन…

सदर आरोपीवर डोंगरे पोलीस स्टेशन मुंबई १) गु.र.नं. ०३/२०१४ भा.द.वि.क. ३६५,३६८,३४४, ३४६, ३२४, ३२५, ५०६, ३४ जेल रोड पोलीस स्टेशन सोलापुर २) गु.र.नं. ३३१ / २०१८ भा. द.वि.क. (बी) (सी), ३४ सोलापुर तालुका पोलीस स्टेशन ३) गु.र.नं. ०२/२०२१ भा.द.वि.क. १४३,१४७,१४८,१४९, ५०४, ५०६, ३८०, ३२७ व चेक बॉऊन्सचे दोन गुन्हे दाखल असुन आरोपीने अशा प्रकारे कोणाची फसवणुक केलेली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री मिलींद मोहिते सो तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक गणेश हनुमंत निंबाळकर, सहा. फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक बापु बनकर, पो.कॉ. दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, सायबर क्राईमचे सुनिल कोळी, चैतन पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram