ओबीसींची जनगणना न करण्याच्या केंद्रसरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध
सावता परिषदेच्या वतीने "जेलभरो" आंदोलन छेडण्याचा कल्याण आखाडे व संतोष राजगुरू यांचा इशारा

ओबीसींची जनगणना न करण्याच्या केंद्रसरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध
सावता परिषदेच्या वतीने “जेलभरो” आंदोलन छेडण्याचा कल्याण आखाडे व संतोष राजगुरू यांचा इशारा
प्रतिनिधी ; निलेश भोंग
ओबीसींची जातनिहाय जनगणना न करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करून सावता परिषदेच्या वतीने “जेलभरो” आंदोलन छेडण्याचा इशारा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू तसेच प्रकाश नेवसे यांनी दिला आहे.
अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही जातींची जनगणना करण्यात येणार नसल्याचा केंद्र सरकारचा धोरणात्मक निर्णय झाला असल्याची स्पष्ट माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेच्या सभागृहात एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे. म्हणजे ओबीसी जनगणनेबाबतीत केंद्र सरकारच्या नियतीमध्ये खोट आहे. ओबीसीची जनगणना करायची नाही हे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्र्याची संख्या अधिक असल्याचा डंका भारतीय जनता पार्टीकडून पिटविण्यात येत आहे. मात्र त्याच मंत्रीमंडळात ओबीसी विरोधी निर्णय घेतले जात असतील तर असल्या बिनकाम्या ओबीसी मत्र्यांची काय पूजा करायची का? असा उपरोधिक टोला लगावून केंद्रातील भाजप सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे कल्याण आखाडे यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्यातील भाजपा नेते ओबीसीबद्दल कळवळा असल्याचा मोठा आव आणत आहे. मात्र त्याचवेळी केंद्रातील भाजप सरकार ओबीसी विरोधी धोरण राबवून ओबीसीच्या हक्कावर आळा घालण्याचे काम करीत आहे. भारतीय जनता पार्टीचे हे वर्तन दुतोंडी म्हांडूळालाही लाजविणारे आहे अशा शब्दात भाजपाच्या दुटप्पीपणाच्या भूमिकेचा कल्याण आखाडे यांनी समाचार घेतला आहे.