बारामती च्या निखिल थोरवे यांचे निबंध स्पर्धेत यश

राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता

बारामती च्या निखिल थोरवे यांचे निबंध स्पर्धेत यश

राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता

बारामती: वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत कसबा बारामती येथील रहिवासी व पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कार्यरत असणारे निखिल सुभाष थोरवे यांना विशेष उल्लेखनीय प्रकारात पारितोषिक मिळाले .

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे मागील वर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निबंध स्पर्धा झाली होती , या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून ५०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी ता. 12 डिसेंबर वरळी मुंबई येथील नेहरू सेंटर मध्ये संपन्न झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले पर्यावरण भारत आज व उद्या या विषयावर त्यांनी निबंध सादर केला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!