ओवरलोडींग गाड्यांवर कायदेशीर कारवाई करावी मनसेने दिले निवेदन
बहुसंख्य मालवाहतूक गाड्यांच्या नंबर प्लेट देखील पुसलेल्या असतात
ओवरलोडींग गाड्यांवर कायदेशीर कारवाई करावी मनसेने दिले निवेदन
बहुसंख्य मालवाहतूक गाड्यांच्या नंबर प्लेट देखील पुसलेल्या असतात
बारामती वार्तापत्र
बारामती शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या ओवरलोडींग गाड्यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी , यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने (दि:२५) रोजी बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
त्याचबरोबर वीट ,वाळू ,मुरुम ,खडी अशा स्वरूपाच्या बांधकामाचे साहित्य घेऊन वाहतूक करणाऱ्या गाड्या या क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करून परिवहन कायद्यांचा भंग करत असल्याबाबत ची गोष्ट पाटील निदर्शनास आणून देण्यात आली. बहुसंख्य मालवाहतूक गाड्यांच्या नंबर प्लेट देखील पुसलेल्या असतात .बारामती एमआयडीसी मधील बहुसंख्य कंपन्यांमधून बाहेर येणाऱ्या गाड्या व आत जाणाऱ्या गाड्या यांच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला असतात .सदर विषयावरती पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन दिला .व याबाबत लवकरच वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून फ्लाईंग स्कॉड सुरू करण्याबाबतची मागणी पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी
आश्वासन दिले .
यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.पोपटराव सूर्यवंशी ,बारामती तालुका अध्यक्ष ॲड.निलेश वाबळे ,संघटक ऋषिकेश भोसले ,शक्ती मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.