स्थानिक
ओवेसींवर हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती मध्ये एमआयएमकडून निषेध
वाहनावर चार राऊंड फायर झाले व त्यांचा जिव घेण्याचा प्रयत्न केला.
ओवेसींवर हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती मध्ये एमआयएमकडून निषेध
वाहनावर चार राऊंड फायर झाले व त्यांचा जिव घेण्याचा प्रयत्न केला.
बारामती वार्तापत्र
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळ्या झाडत हल्ला करण्यात आला
आहे.ओवेसिंवर करण्यात आलेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ एमआयएमकडून राज्यभरात निदर्शने करण्यात आली. एमआयएम, बारामती शहर च्या वतीने बारामती येथे घोषणाबाजी करून हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
तसेच या हल्ल्यामागील दोषींना त्वरित अटक करून त्यांचेवर कठोर कारवाई करावी आणि गृहमंत्रालयाकडून ओवेसींना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन एमआयएमच्या वतीने बारामती येथील तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जावेद बागवान, मुस्तकीम आत्तार, अजीम शिकीलकर, मोहसीन मनेर, इफ्तेखार आत्तार, शाहबाज खान, आरिफ आत्तार, अजमत बागवान इत्यादी उपस्थित होते.