स्थानिक

‘ओ’ साहेब दिवाळी ‘बोनस’ देता का ? बारामतीत नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संताप

कोट्यवधींच्या प्रस्तावना धडाधड मंजुरी मात्र बोनस द्यायला पैसे शिल्लक नाहीत

‘ओ’ साहेब दिवाळी ‘बोनस’ देता का ? बारामतीत नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संताप

कोट्यवधींच्या प्रस्तावना धडाधड मंजुरी मात्र बोनस द्यायला पैसे शिल्लक नाहीत

बारामती वार्तापत्र

एकीकडे बारामती नगरपालिकेकडून कोट्यवधींच्या कामांच्या निविदा धडाधड मंजूर केल्या जात असताना कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी बोनस’ देण्यासाठी पालिकेकडे पैसे शिल्लक नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.त्यामुळे ‘ओ’ साहेब बोनस देता का बोनस म्हणायची वेळ आली असून कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणात तसेच कोरोनाच्या काळात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावली होती. गेल्या दीड-दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करण्यास शासनाची परवानगी नव्हती मात्र यंदा आपली दिवाळी गोड होईल या आशेने बसलेल्या कर्मचाऱ्यांना यंदाही दिवाळी अंधारातच काढावी लागेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारामतीत येणार आहेत म्हणून पुढाऱ्यांबरोबरच अधिकारी वर्गाची लगबग सुरू आहे.संपुर्ण शहर चकाचक करण्यात पालिका कर्मचारी मग्न आहेत.त्यामुळे आपल्या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सदरील प्रश्नाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांची दिवाळी पहाट सोनेरी करणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

नगरपालिकेच्या गटातटाच्या राजकारणात कर्मचाऱ्यांचे मरण ?

बारामती नगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये आपापसात एकवाक्यता नसून त्यांच्या गटबाजीचा फटका पालिका कर्मचाऱ्यांना बसत असल्याची चर्चा शहरातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांकडून दबक्या आवाजात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!