कंगना रणौत हिने जे काही वक्तव्य केले ते बरोबर ; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले
गोखले यांच्या या भूमिकानंतर आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय.
कंगना रणौत हिने जे काही वक्तव्य केले ते बरोबर ; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले
गोखले यांच्या या भूमिकानंतर आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय.
प्रतिनिधी
अभिनेत्री कंगना रनौतने देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे.
कंगना रणौत हिने जे काही वक्तव्य केले आहे, ते बरोबर आहे, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले. स्वतंत्र हे आपल्याला दिले गेलेले आहे. जे स्वतंत्र योद्धा स्वातंत्र्यासाठी लढत होते, ते जेव्हा फाशीवर चढत होते तेव्हा त्याकाळचे मोठ्या लोकांनी त्यांना वाचवले नाही आणि ते लोक स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्री झाले, असे देखील यावेळी गोखले म्हणाले. आपण कोणत्याही पक्षाशी, राजकारण्याशी संबंधित नाही असे ते म्हणाले, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं च्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी
विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या चित्रपट सेनेकडून निषेध करण्यात आलाय. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विक्रम गोखले यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. गोखलेंनी ठाकरेंशी कोणताही संबंध जोडू नये. त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी,” असे शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या चिटणीस कीर्ती पाठक यांनी म्हटले आहे.
विक्रम गोखले काय म्हणाले ?
विक्रम गोखले आज (14 नोव्हेंबर) पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप-शिवसेना युती, कंगना रनौत यांचे वादग्रस्त वक्तव्य यावर आपली भूमिका मांडली. “भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का ? योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी,” असे विक्रम गोखले म्हणाले.