कटफळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सिमा सिताराम मदने यांची बिनविरोध निवड
नागरिकांना जास्तीजास्त सुविधा देऊ
कटफळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सिमा सिताराम मदने यांची बिनविरोध निवड
नागरिकांना जास्तीजास्त सुविधा देऊ
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील औद्योगिक दृष्टया म्हतपूर्ण कटफळ ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सीमा सीताराम मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवार 21 मार्च रोजी कटफळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी मदने यांचा एकमेव अर्ज आलेला होता. त्यामूळे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून ग्रामसेवक महेंद्र बेंगारे यांनी काम पाहीले.
यावेळी सरपंच पुनम किरण कांबळे, सदस्य डॉ.संजय मोकाशी, संग्रामसिंह मोकाशी , तात्याराम रांधवण, विजय कांबळे, संध्याराणी झगडे , संध्या मोरे , सविता लोखंडे व सामाजिक कार्यकर्ते किरण कांबळे ग्रामस्थ सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना जास्तीजास्त सुविधा देऊ व शासनाच्या योजना तळागाळात पोहचविण्याचे काम प्रभावी पणे सर्व पदाधिकारी यांच्या साह्याने करू असे निवडणीनंतर मदने यांनी सांगितले सर्वांचे आभार सरपंच पूनम कांबळे यांनी मानले