मुंबई
कट्टरपंथींना शिवसेना आपलीशी वाटायला लागली,नितेश राणेंकडून शिवसेनेवर टीकास्त्र
आता येत्या काळात राज्यात आणखी काय घडामोडी घडतायत हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.
कट्टरपंथींना शिवसेना आपलीशी वाटायला लागली,नितेश राणेंकडून शिवसेनेवर टीकास्त्र
आता येत्या काळात राज्यात आणखी काय घडामोडी घडतायत हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.
प्रतिनिधी
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील महाविकास आघाडीला युती साठी ऑफर दिल्या नंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
“वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..
कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे.खरंच, करून दाखवलं!!” अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
दरम्यान,इम्तियाज जलील यांची हि ऑफर शिवसेनेनं स्प्ष्टपणे नाकारली असून राष्ट्रवादीने देखील यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.त्यामुळे आता येत्या काळात राज्यात आणखी काय घडामोडी घडतायत हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.